

BJP MP Nishikant Dubey raises questions about Sonia Gandhi's alleged ownership of Maruti Company and the role of the Indira Gandhi government
esakal
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेसच्या इतिहासातील एका प्रकरणाचा उल्लेख करत माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मारुती कंपनीच्या मालकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी या प्रकरणाला ‘काँग्रेसचा काळा अध्याय’ असे संबोधले आहे. सोनिया गांधी या परदेशी नागरिक असतानाही मारुती कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक कशा बनल्या आणि कंपनीतील ५० टक्के मालकी त्यांच्याकडे कशी आली, असा सवाल दुबे यांनी उपस्थित केला आहे.