Sonia Gandhi
esakal
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग आता त्यांच्या नव्या पुस्तकातून समोर येणार आहेत. ‘बिलॉन्गिंग – ए जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातून त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी आणि राजकीय जीवनाशी संबंधित अनुभव मांडले आहेत. विशेष म्हणजे, राजीव गांधी यांना देशाचे पंतप्रधान बनवले जात असताना आपण त्याच्या पूर्णपणे विरोधात होतो, असा खुलासा सोनिया गांधी यांनी या पुस्तकात केला आहे.