Sonia Gandhi
esakal
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांचं ‘Belonging: A Journey of Love’ हे आत्मचरित्र अखेर वाचकांच्या भेटीला आलं आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील एका अत्यंत वेदनादायी प्रसंगाचा पहिल्यांदाच खुलासा केला आहे. राहुल गांधी यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या आपल्या पहिल्या मुलाचा जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला होता, असं त्यांनी पुस्तकात सांगितलं आहे.