गरिबांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य द्या; सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र 

वृत्तसंस्था
Tuesday, 23 June 2020

गरिबांचे, स्थलांतरित मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचे हाल होत आहेत.तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच सप्टेंबर २०२०पर्यंत गरिबांना धान्य मोफत द्यावे,अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे.

नवी दिल्ली - देशातील गरिबांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 
लॉकडाउन सुरू केल्यापासून गरिबांचे, स्थलांतरित मजुरांचे आणि हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचे हाल होत आहेत. त्यामुळे आणखी तीन महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच सप्टेंबर २०२०पर्यंत गरिबांना धान्य मोफत द्यावे, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली आहे. अनेक राज्यांनीही याबाबत मागणी केली आहे. केंद्र सरकार या विनंतीचा मान राखेल व तातडीने कृती करेल अशी आशा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मागील तीन महिन्यांत लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी देशभरात करण्यात आली. या काळात लाखो गरिबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. तसेच अनेक लोक दारिद्र्याच्या गर्तेत ढकलले गेले. अशात गरिबांच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना धान्य उपलब्ध करून देण्यात आले. ते पुढे आणखी तीन महिने उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत गरिबांना ५ किलो धान्य हे प्रतिमहिना उपलब्ध करून द्यावे, असे सोनियांनी म्हटले आहे. 

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sonia Gandhi Writes to PM for 3 Month Extension of Free Food Grain