

South Africa Eyes India as Key Partner for Africa’s Growth
esakal
मुंबई : आफ्रिकेतील वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिण आफ्रिका भारतीय कंपन्यांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरू शकते, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचे मुंबईतील कौन्सुल जनरल जी. लाबाने यांनी व्यक्त केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीचे संबंध वाढत असून संरक्षण, एरोस्पेस, AI, IT, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांत भारतीय कंपन्यांसाठी मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवर त्यांनी AP Global Digital ला मुलाखत दिली. ही मुलाखत अपर्णा प्रभूदेसाई यांनी घेतली.