
VIDEO : सपाच्या मुलायमसिंह यांनी भाजप मंत्री स्मृती इराणींना दिला आशीर्वाद
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) पहिल्या दिवशी एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि खासदार मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांना संसेदच्या परिसरात नमस्कार केला. यावेळी मुलायमसिंह यांनी स्मृती इराणींना आशीर्वाद दिसले.
हेही वाचा: UP Election: सप आघाडी औटघटकेची; ‘जाटलॅंड’मध्ये अमित शहांचा दावा
एएनआयने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये मुलायम सिंह यादव काळजीपूर्वक पायऱ्या उतरून संसदेच्या सभागृहात प्रवेश करताना दिसतात. त्यावेळी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी त्यांच्याजवळ गेल्या आणि त्यांनी मुलायमसिंह यांच्या पायांना स्पर्श करत नमस्कार केला. यावेळी मुलायम सिंह यांनी इराणींना आशीर्वाद देखील दिल्याचे व्हिडिओमध्ये दिसतेय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप आणि समाजवादी पक्षामध्ये थेट सामना रंगणार आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. यामध्ये भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी मुलायमसिंह यांचा आशीर्वाद घेतल्याच्या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारी सुरू झाले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ सादर केले. सलग चौथ्या वर्षी त्या त्यांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यार आहेत. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले. त्यांनी कोरोना, अन्न सुरक्षा, महिला सक्षमीकरण यासह इतर क्षेत्रातील मोदी सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.
Web Title: Sp Leader Mulayamsingh Yadav Blesses Bjp Minister Smriti Irani At Parliament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..