UP : मुस्लिम आरोपींना भरचौकात अर्ध्यावर गाडून दगडांनी मारून टाका; सपा खासदाराचं वादग्रस्त विधान

लखीमपूर खेरीत दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे.
Syed Tufail Hassan
Syed Tufail Hassanesakal
Summary

लखीमपूर खेरीत दोन दलित बहिणींवर सामूहिक बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद (Uttar Pradesh Moradabad) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. एस. टी. हसन यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय. लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुस्लिम आरोपींना चौकाचौकात अर्ध्यावर गाडून त्यांना दगडांनी मारून शिक्षा करण्याची मागणी केलीय. जेणेकरून भविष्यात कोणीही बलात्काराचा प्रयत्न करणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

सपा खासदार (SP MP) सय्यद तुफैल हसन (Syed Tufail Hassan) यांनी मागणी केलीय की, लखीमपूर खेरी सामूहिक बलात्कार आणि हत्येमध्ये सहभागी असलेल्या मुस्लिम (Muslim) आरोपींना अशी शिक्षा द्यावी, जेणेकरुन अन्य मुस्लिम अशी घटना कधीच घडवणार नाहीत. मुस्लिम आरोपींना भरचौकात अर्ध्यावर गाडून त्यांना दगडांनी मारावं, असंही त्यांनी नमूद केलंय.

Syed Tufail Hassan
Chandigarh University : 60 विद्यार्थिनींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल, 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

बुधवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यातील निघासन पोलीस स्टेशन परिसरात दोन दलित बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले होते, त्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. मुलींचं त्यांच्या घराबाहेरून अपहरण करण्यात आलं. काही वेळानं त्यांचा मृतदेह जवळच असलेल्या उसाच्या शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत बहिणी 15 आणि 17 वर्षांच्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, 'मुलींचं अपहरण झालं नव्हतं. त्या स्वत:च्या मर्जीनं दुचाकीवरून गेल्या होत्या. आरोपी मृत मुलींना आधीपासूनच ओळखत होता. मुख्य आरोपी छोटू यानं दोन्ही मुलींची आरोपीशी ओळख करून दिली होती. मात्र, तो घटनास्थळी उपस्थित नव्हता. आरोपी सोहेल आणि जुनैदनं दोन्ही मुलींवर बलात्कार केला. आतापर्यंत पोलिसांनी 6 आरोपींना अटक केलीय.'

Syed Tufail Hassan
Unique Love Story : पती आणि पाच मुलांना सोडून महिलेनं थाटला विवाहित प्रियकरासोबत 'संसार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com