Loksabha 2019 : मोदींच्या विरोधात 'सप' कडून 'बीएसएफ'च्या माजी जवानाला उमेदवारी 

Loksabha 2019 : मोदींच्या विरोधात 'सप' कडून 'बीएसएफ'च्या माजी जवानाला उमेदवारी 

लखनौ (पीटीआय) : जवानांना देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता खराब असल्याची तक्रार करणारे आणि सीमा सुरक्षा दलातून (बीएसएफ) हकालपट्टी करण्यात आलेले माजी जवान तेजबहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने (सप) वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात रिंगणात उतरविले आहे.
 
मोदींच्या विरोधात वाराणसीमधून कॉंग्रेसने अजय राय यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. "सप'ने आधी शालि यादव यांना वाराणसीमधून उमेदवारी देण्याची घोषणा केली होती, मात्र मोदींच्या विरोधात आता बीएसएफचे माजी कॉन्स्टेबल तेजबहादूर यादव हे उमेदवार असतील, असे "सप'कडून आज जाहीर करण्यात आले. "सप'ने उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाबरोबर आघाडी केली आहे. 
यादव हे वाराणसीतून मोदींच्याविरोधात "सप'चे उमेदवार असतील, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्याने दिली. वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात 19 मे रोजी मतदान होणार आहे. 

भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे माझी बीएसएफमधून हाकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे आता संरक्षण दलांमधून भ्रष्टाचार संपूर्णपणे निपटून काढण्याचे माझे ध्यैय आहे. 
- तेजबहादूर यादव, बीएसएफचे माजी कॉन्स्टेबल 

बीएसएफमध्ये असताना यादव यांना जम्मू आणि काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेला लागून असलेल्या पर्वतीय भागात तैनात करण्यात आले होते. बीएसएफच्या जवानांना अतिशय वाईट दर्जाचे अन्न देण्यात येते, असा आरोप यादव यांनी केला होता. त्याबाबतचा एक व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर शिस्त मोडल्याचे कारण देत यादव यांची बीएसएफमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com