Spain Tourist Gangraped in Jharkhand: स्पॅनिश पर्यटक महिलेवर सामूहिक अत्याचार करून बेदम मारहाण; झारखंडमधील संतापजनक प्रकार

Spain Tourist Gangraped in Jharkhand: दुमका येथे स्पेनच्या एका महिला पर्यटकावर ७-८ तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. तसेच महिलेला बेदम मारहाण केली. पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
Spain Tourist Gangraped in Jharkhand
Spain Tourist Gangraped in JharkhandEsakal

Spain Tourist Gangraped in Jharkhand: झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुरुमहाट येथील एका स्पॅनिश परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या प्रकरणाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ज्यांची चौकशी केली जात आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलिस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पेनमधून आलेले एक महिला आणि एक पुरुष पर्यटक दोन वेगवेगळ्या बाइकवरून जात होते. संध्याकाळची वेळ असल्याने दोघेही हंसदिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरमहाटजवळ विश्रांतीसाठी थांबले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा 10 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 या संख्येतील तरुण तेथे आले आणि त्यांनी प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर महिलेवर बलात्कार केला. या घटनेत दोघेही जखमी झाले आहेत.

Spain Tourist Gangraped in Jharkhand
Crime News: आधी तीन तलाक, मग दिरासोबत हलाला अन् गर्भपात; मुस्लीम महिलेची अंगावर शहारा आणणारी आपबीती

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री घटनास्थळ गाठून दोघांनाही सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे महिलेवर उपचार सुरू आहेत. सरैयाहाट रुग्णालयाबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. रुग्णालयात कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे.

Spain Tourist Gangraped in Jharkhand
Ram Rahim : राम रहीमला वारंवार पॅरोल का मिळतो? हरियाणा सरकारने २०२२ मध्ये कायद्यात केले 'हे' बदल

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पोलिसांनी हंसदिहा पोलीस स्टेशन हद्दीतील कुंजी गावातील तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच एसपी पीतांबर सिंह खेरवार, जारमंडीचे एसडीपीओ संतोष कुमार आणि दुमका डीएसपी रात्रीपासून हंसदिहामध्ये तळ ठोकून आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह रात्रीच बचावकार्य केले.

Spain Tourist Gangraped in Jharkhand
Bengaluru Rameshwaram Cafe Blast: ‘आईचा फोन आला, मी काऊंटरपासून पुढे…’, तितक्यात मोठा स्फोट अन्..., इंजिनिअरने सांगितला भयानक अनुभव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com