'अंगणवाडीतील खराब अंडी खाऊन पाहा', सभापतींचा मंत्र्यांना खोचक सल्ला; सभागृहात अंड्यांची पिशवी आणली, पण..

हेब्बाळकर बचाव करत असताना बसवराज होरट्टी यांनी मध्यस्थी करत ‘अंडी खाता का’? अशी विचारणा केली.
Minister Lakshmi Hebbalkar
Minister Lakshmi Hebbalkaresakal
Updated on
Summary

हेमलता नाईक यांनी आक्षेप घेत अनेक अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात आहे. अंडी, केळी हे सर्व खराब आहेत. ती खाण्यास योग्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

बंगळूर : मंत्र्यांनी खराब अंडे (Egg) खाऊन पाहावे, म्हणजे अंगणवाड्यांत मुलांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराची परिस्थिती कशी आहे हे समजेल, असा खोचक सल्ला सभापती बसवराज होरट्टी (Speaker Basavaraj Horatti) यांनी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांना विधान परिषदेत दिला.

प्रश्नोत्तराच्या सत्रात आमदार हेमलता नाईक यांनी अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात येणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे सांगून महिला व बाल कल्याणमंत्री हेब्बाळकर यांचे लक्ष वेधले. आपले सरकार मुलांना पौष्टिक दर्जाचे अन्न पुरवते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे हेब्बाळकर यांनी सांगितले.

Minister Lakshmi Hebbalkar
हात-पाय, डोळे बांधून, विषारी औषध पाजून जवानाला ठार मारण्याचा प्रयत्न; पत्नीला अटक, गडहिंग्लजमध्ये नेमकं काय घडलं?

यावर हेमलता नाईक यांनी आक्षेप घेत अनेक अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात आहे. अंडी, केळी हे सर्व खराब आहेत. ती खाण्यास योग्य नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हेब्बाळकर बचाव करत असताना बसवराज होरट्टी यांनी मध्यस्थी करत ‘अंडी खाता का’? अशी विचारणा केली. खराब अंडे एकदा खाल्ल्यास कळेल, असे सांगत अंगणवाड्यांचे वास्तव समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Minister Lakshmi Hebbalkar
विशाळगड दंगलीनंतर भेदरलेल्या कोवळ्या मुलांची शाळाही दुरावली; दंगल होऊन चार दिवस उलटले, तरी मुलं भीतीच्या छायेखाली

तेव्हा हेब्बाळकर म्हणाल्या, ‘मी अजून अंडे खाल्ले नाही. हाताने स्पर्शही केला नाही. काही त्रुटी असतील, तर त्या दुरुस्त करू. राज्यात अंगणवाडी केंद्र सुरू होऊन ४९ वर्षे झाली आहेत. आजपर्यंत कुठेही कटू घटना घडली नाही. अंगणवाडीच्या अडचणी सोडवल्या जातील.’ यावेळी होरट्टी यांनी आमदारांसमवेत अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन समस्यांच्या शंकांचे निराकरण करा, ज्या भागात समस्या आहेत, त्याकडे प्राधान्याने लक्ष केंद्रित करा, असा सल्ला दिला.

सभागृहात अंड्यांची पिशवी आणली

यावेळी हेमलता नाईक यांनी पिशवीतून निकृष्ट दर्जाची अंडी दाखवण्यासाठी सभागृहात आणली होती. मात्र ती दाखविण्यास सभापतींनी परवानगी दिली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.