Parliament Session : लोकसभेचा नवा अध्यक्ष कोण? येत्या २४ जूनपासून अधिवेशन शक्य; बिर्ला की नव्यांना संधी

Parliament Session Latest News : अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. त्यानंतर २६ तारखेला अध्यक्ष निवडला जाऊ शकतो.
Parliament Session
Parliament Session

नवी दिल्ली, ता. ११: नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी तसेच लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन येत्या २४ जूनपासून केले जाणार असल्याची माहिती मंगळवारी सूत्रांनी दिली. मोदी -३ सरकारच्या कार्यकाळात लोकसभा अध्यक्ष कोण बनणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसात नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. त्यानंतर २६ तारखेला अध्यक्ष निवडला जाऊ शकतो. मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली जाणार की कनिष्ठ सदनाला नवीन अध्यक्ष लाभणार, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. २४ जून ते ३ जुलै असे आठ दिवस विशेष अधिवेशन बोलाविण्याची योजना आहे. अधिवेशनाचे आठ कामकाजाचे दिवस असतील. रालोआ सरकारच्या स्थिरतेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या तेलगू देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाचा अध्यक्षपदावर डोळा असल्याची चर्चा आहे. नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभी राष्ट्रपतींकडून हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. हंगामी अध्यक्ष तमाम खासदारांना शपथ देतात. सर्वात वरिष्ठ नेत्याला हंगामी अध्यक्ष बनविण्याची परंपरा आहे. शपथविधीच्या कार्यक्रमानंतर अध्यक्षाची बहुमताने निवड केली जाते.

Parliament Session
Onion Prices: कांदा पुन्हा रडवणार? भाव 50 टक्क्यांनी वाढले; निवडणुका संपताच भाव का वाढले?

पुरंदेश्वरी देवी, नायडू, माथूर यांची नावे चर्चेत


लोकसभा अध्यक्षपदासाठी जी नावे चर्चेत आहेत, त्यात आंध्र प्रदेशातील भाजपच्या नेत्या डी. पुरंदेश्वरी, याच राज्याचे टीडीपी नेते राममोहन नायडू आणि जी. एम. हरीश माथूर यांची नावे चर्चेत आहेत. टीडीपीचे संस्थापक एन. टी. रामाराम यांच्या कन्या असलेल्या दुगुबती पुरंदेश्वरी या आंध्र प्रदेश भाजपच्या अध्यक्षा आहेत. याआधी केंद्रात राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. राममोहन नायडू यांनी अलिकडेच केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली होती. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत येरन नायडू यांचे पुत्र असलेले राममोहन नायडू हे टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जी. एम. हरीश माथूर हे लोकसभेचे माजी अध्यक्ष स्व. जी. एम. सी. बालयोगी यांचे पुत्र आहेत.

Parliament Session
Yugendra Pawar: "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com