Yugendra Pawar: "बारामतीचा दादा बदलायचाय"; युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतली शरद पवारांची भेट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांच्या उमेदवारीबाबत सध्या चाचपणी सुरु झाली आहे.
Yugendra Pawar
Yugendra Pawaresakal

पुणे : बारामतीचा दादा आम्हाला बदलायचाय अशा शब्दांत युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडं साकडं घातल्याची माहिती मिळते आहे. याचा अर्थ आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी याची चाचपणी केली जात आहे.

शरद पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारात हजेरी लावली यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडं वरील मागणी केली. (Baramati Dada wants to change Yugendra Pawar workers met and demanded to Sharad Pawar)

Yugendra Pawar
Lok Sabha Special Session: लोकसभेचं २४ जूनपासून विशेष अधिवेशन? लोकसभा अध्यक्षांची होणार निवड

शरद पवारांचा बारामती दौरा

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर बारामती मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी तसेच दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी आजपासून तीन दिवस शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज पूर्ण दिवस शरद पवार हे बारामती शहरात गाठी-भेठी घेणार आहेत. दरम्यान, युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारातही शरद पवारांनी हजेरी लावली. त्यामुळं सहाजिकच अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Yugendra Pawar
D Purandeshwari: लोकसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या डी पुरंदेश्वरी कोण? चंद्राबाबूंना गप्प करण्यासाठी भाजपची खेळी!

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणे आहेत. अजितदादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार आणि शरद पवार हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले मात्र युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत. बारामतीत विद्या प्रतिष्ठानसह विविध समाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग आहे. या उपक्रमांमध्ये ते महत्वाच्या पदांवर कार्यरतही आहेत.

Yugendra Pawar
मोठी बातमी! रत्नागिरीत दरड कोसळल्याने अनेका गावांचा संपर्क तुटला

बारामतीत काका विरुद्ध पुतण्या लढाई?

लोकसभा निवडणुकीत बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अर्थात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पाहायला मिळाला. त्यानंतर आता काका विरुद्ध पुतण्या असा समाना अर्थात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामनाही पाहायला मिळू शकतो. त्याच दृष्टीनं युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साकडं घातलं आहे.

Yugendra Pawar
UP Election Result: उत्तर प्रदेशात धक्कादायक निकालाचं खरं कारण आलं समोर...नोटा कसं ठरलं गेम चेंजर?

बारामतीचा दादा बदलायचाय

आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, त्यासाठी युगेंद्र पवारांना संधी द्या. आम्ही युगेंद्र पवारांच्या बाजूनं आहोत तुम्हीही त्यांच्याकडं लक्ष द्या. आम्हाला बारामतीत शांत स्वरुपाचा दादा हवा आहे कारण सध्याच्या दादांपुढं आमचं काही चालत नाही, अशा शब्दांत काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडं आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. यावर शरद पवारांनी त्यांना प्रतिसाद देताना काही काळ संयम राखण्याचा सल्ला दिल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com