बिहारमध्ये ‘Special 26’; तब्बल ३५ लाखांनी फसवणूक| Fraud | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fraud

बिहारमध्ये ‘Special 26’; तब्बल ३५ लाखांनी फसवणूक

बिहार : तुम्ही बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘स्पेशल २६’ हा चित्रपट बघितला असेल. व्यावसायिकांच्या घरावर सीबीआयच्या बनावट पथकाने छापा टाकून रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढल्याचे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. अशीच एक घटना बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील वाळू व्यापाऱ्यासोबत घटली. बनावट इन्कम टॅक्स ऑफिसरच्या लोकांनी तब्बल २५ लाखांची रोकड आणि दहा लाखांचे दागिने घेऊन (Cash theft of Rs 35 lakh) पळ काढला.

सोमवारी संजय सिंग (रा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, लखीसरायल) या वाळू व्यावसायिकांच्या घरात बनावट आयकर अधिकारी आले. घरात शिरताच महिला व मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतले. यानंतर घरात त्यांनी २५ लाखांची रोकड आणि १० लाखांचे दागिने घेऊन पलायन (Cash theft of Rs 35 lakh) केले.

हेही वाचा: मटण खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे टाळा; अन्यथा या परिणामांना तयार राहा

आरोपी घरातील पैसे आणि दागिने घेऊन जात असताना संजय यांना कोणीतरी फोन केला. त्यानंतर ते घरी पोहोचला. स्वत:ला आयकर अधिकारी म्हणून सांगून गुन्हेगारांनी संजय आणि ड्रायव्हरला बेड्या ठोकल्या. पैसे आणि दागिने घेऊन गुन्हेगारांनी संजयला घरात नेले आणि मुख्य गेट बाहेरून बंद करून वाहनातून पळ काढला.

वाटेत गुन्हेगार म्हणाले की, आयकर कार्यालयात जातोय तुम्ही तिथे या. यानंतर संजय हे प्राप्तिकर कार्यालयात जाण्यासाठी घरातून निघाले असता गेट बाहेरून बंद होता. यानंतर संजय यांनी फोन करून घराचे गेट उघडले आणि प्राप्तिकर कार्यालयात पोहोचले. तेव्हा कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांना समजले. यामुळे संजय यांनी कबैया पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा: दोन वर्ष होता मुलायमसिंहाचा सुरक्षारक्षक, यंदा अखिलेशविरोधात भाजपने दिली उमेदवारी

सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

घरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) गुन्हेगार आल्यापासूनचे रेकॉर्डिंग होते. पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका व्यावसायिक क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून आलेले गुन्हेगार वाहनातून उतरताना, घरात प्रवेश करताना आणि घराबाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

गुन्हेगारांनी तोंडावर मास्क

गुन्हेगारांच्या पथकात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. घरमालकाला फसवण्यासाठी आरोपी मेटल डिटेक्टर घेऊन आले होते. दोन महिलांपैकी एकीने साडी तर दुसरीने जीन्स आणि कुर्तीवर जॅकेट घातले होते. सर्व गुन्हेगारांनी तोंडावर मास्क होते.

Web Title: Special 26 Crime News Bihar Cheating Fake It Officer Cash Theft Of Rs 35 Lakh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top