पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी वर्षाला होतात तब्बल एवढे कोटी रुपये खर्च

वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवर एका वर्षात तब्बल ६०० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलेले आहे. त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)असे म्हणतात. या SPGसाठी यावर्षी अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपायांची तरतूद करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवर एका वर्षात तब्बल ६०० कोटी रुपयांचा खर्च केला जातो. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलेले आहे. त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG)असे म्हणतात. या SPGसाठी यावर्षी अर्थसंकल्पात तब्बल ६०० कोटी रुपायांची तरतूद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

SPGमध्ये सध्या 300 कमांडोंचा समावेश आहे. त्यांना अतिशय कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी त्यांची निवड करण्यात येते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी ५४० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधानांचे देश विदेशातले दौरे, त्यांचं निवासस्थान, त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीचं संरक्षण कव्हर पंतप्रधानांना दिले जाते.

जीएसटीबाबत अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; जेटलींचीही आठवण

यापूर्वी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही  एसपीजी संरक्षण दिलं जात होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी एसपीजी कायद्यात दुरुस्ती करुन ते फक्त पंतप्रधानांसाठीच मर्यादित ठेवण्यात आले आहे. तत्पूर्वी, आपल्या देशात पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतात. देशातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती पंतप्रधान असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च सुरक्षा नियमांचं पालन केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SPG Protection For PM has a Budget Rs 600 Cr