SpiceJet च्या विमानात पुन्हा बिघाड; दिल्लीहून नाशिकला येणाऱ्या विमानाची Emergency Landing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spicejet Aircraft

स्पाइसजेटच्या विमानातील गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीय.

SpiceJet च्या विमानात पुन्हा बिघाड; दिल्लीहून नाशिकला येणाऱ्या विमानाची Emergency Landing

नवी दिल्ली : स्पाइसजेटच्या विमानातील (Spicejet Aircraft) गैरप्रकार थांबण्याचं नाव घेत नाहीय. आज (गुरुवार) दिल्लीहून एक विमान नाशिकला (Nashik) जात असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ते विमान तातडीनं दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) उतरवण्यात आलं.

हेही वाचा: Sopore Encounter : सोपोरमध्ये जोरदार चकमक; जैश-ए-मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

स्पाइसजेटनं दिलेल्या माहितीनुसार, विमान आणि त्यातील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना पाठवण्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, स्पाइसजेटचं बी 737 विमान गुरुवारी सकाळी दिल्लीहून नाशिकला जात होतं. विमान हवेत असताना त्याच्या ऑटो पायलटला समस्या आली. यानंतर वैमानिकानं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली.

हेही वाचा: US : भारतीय-अमेरिकन डॉक्टरानं PM मोदी, CM जगन मोहन रेड्डी, अदानींविरोधात दाखल केला खटला

त्यानंतर वैमानिकाला दिल्ली विमानतळावर परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या स्पाइसजेटचं बोईंग 737 विमान सुरक्षितपणे उतरलं आहे. तसेच डीजीसीएनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: 'माझं मन इतकं चंचल की...', प्राजक्ताचं गणेशाला साकडं

Web Title: Spicejet B737 Aircraft Delhi Nashik Returned Midway Autopilot Dgca Officer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..