

SpiceJet Aircraft Returns to Delhi After Engine Problem
Esakal
Spicejet Plane Emergency Landing in Delhi: दिल्लीहून लेहला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या बोइंग ७३७ विमानाचं मंगळवारी दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. उड्डाणानंतर तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यानं लेहला जाण्याऐवजी विमान पुन्हा मागे वळवून दिल्ली विमानतळावर उतरवलं. या विमानातून १५० प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येतेय.