air travel
air travelesakal

आता EMI वर करता येणार हवाई प्रवास! काय आहे नवी योजना?

मुंबई : आता तुम्ही EMI वर हवाई प्रवास करू शकता. स्पाइसजेटने (spicejet) सोमवारी एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत प्रवासी तीन, सहा किंवा 12 हप्त्यांमध्ये तिकिटांचे पैसे भरू शकता. काय आहे ही योजना? वाचा सविस्तर...

तीन महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय

स्पाईसजेटने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "या ऑफर अंतर्गत, ग्राहक कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय (व्याजशिवाय) तीन महिन्यांच्या ईएमआयचा पर्याय घेऊ शकतील."

अर्जदाराला पॅन क्रमांक, आधार क्रमांक किंवा यांसारखे मूलभूत तपशील प्रदान करावे लागतील.

VID आणि पासवर्डसह सत्यापित करावे लागेल.

प्रथम EMI UPI ID वरून भरावा लागेल

ग्राहकांना त्यांच्या UPI ID वरून पहिला EMI भरावा लागेल

त्यानंतरचा EMI त्याच UPI ID वरून कापला जाईल.

कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड तपशील देण्याची आवश्यकता नाही.

air travel
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर; भेटीचे कारण काय?

कोविड-19 महामारी रोखण्यासाठी, एअर बबल करारांतर्गत, दोन देश काही निर्बंध आणि कठोर नियमांनुसार आपापसात आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्यास परवानगी देतात. त्याच वेळी, एअरलाइन विस्ताराने भारत आणि युरोपमधील एअर बबल करारांतर्गत दिल्ली ते पॅरिस थेट विमान सेवा सुरू केली आहे. विस्ताराने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी रविवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅरिसच्या चार्ल्स डी गॉल विमानतळापर्यंतचे पहिले थेट उड्डाण चालवले. करारानुसार, या दोन्ही शहरांदरम्यान आठवड्यातून दोनदा - बुधवार आणि रविवारी बोईंग 787-9 (ड्रीमलायनर) विमानाने उड्डाण करेल. टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त उपक्रम विस्तारासाठी पॅरिस हे सातवे परदेशी गंतव्यस्थान आहे, जिथे कंपनी एअर बबल करारांतर्गत आपली उड्डाण सेवा चालवत आहे.

air travel
कोव्हॅक्सिनचा मंजूर लशींमध्ये समावेश; UK सरकारचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com