
SpiceJet : स्पाईसजेटला दुसऱ्या तिमाहीत तब्बल 789 कोटींचा तोटा
खासगी क्षेत्रातील विमान कंपनी स्पाइसजेटला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. SpiceJet ने 30 जून 2022 च्या तिमाहीत तब्बल 789 कोटी रुपयांचा (परकीय चलन समायोजन वगळून रु. 420 कोटी) चा निव्वळ तोटा नोंदवला आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत एअरलाइनला 729 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
विमान कंपनीने बुधवारी एक निवेदन जारी करून ही माहिती दिली. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की इंधनाच्या वाढत्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे त्यांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे असे कंपनीने म्हटले आहे.
स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि एमडी अजय सिंग यांनी कंपनीच्या या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. विमान इंधनाच्या किमतीत सातत्याने होणारी वाढ आणि घसरणारा रुपया याचा प्रामुख्याने स्पाइसजेटच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाल्याचे ते म्हणाले. कंपनीचे एमडी अजय सिंग म्हणाले, सध्याचे अत्यंत कठीण ऑपरेटिंग वातावरण आहे आणि आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केल्यानंतर देखील आम्ही आमच्या भविष्याबद्दल आणि कंपनीच्या स्थितीत सुधारणा करण्याबद्दल आशावादी आहोत.
स्पाईसजेट एअरलाईन गेल्या चार वर्षांपासून तोट्यात आहे . 2018-19, 2019-20 आणि 2020-21 मध्ये अनुक्रमे 316 कोटी रुपये, 934 कोटी रुपये आणि 998 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यानंतर, एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये कंपनीला 1,248 कोटी रुपयांचा तोटा झाला.