संसदीय नेतेपदावरून शरदबाबूंची हकालपट्टी

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

शहा यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेत नितीशकुमार यांनी चार वर्षांनंतर पुन्हा "एनडीए'त सहभागी होताना पूर्ण करणे आवश्‍यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल चर्चा केली. त्यानंतर आज सकाळीच शरद यादव यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली. काल वेंकय्या नायडू यांच्या स्वागतावेळी राज्यसभेतील "जेडीयू' नेते म्हणून भाषण करणारे वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, की शरद यादव यांची हकालपट्टी केली नसून, त्यांचे स्थान बदलले (रिप्लेस) आहे. सध्याच्या त्यांच्या हालचाली बघता तसे करणे आवश्‍यक होते.

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) "अध्यक्ष' शरद यादव यांचेच ग्रह फिरल्याचे दिसत आहे. पक्षाने आज सकाळीच यादव यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते आर. सी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नितीशकुमार यांच्या "जेडीयू'ची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चार वर्षांनी "घरवापसी' होताना यादव यांना आपल्या "हाउस'मधील (राज्यसभा) पहिल्या बाकावरील जागाच गमवावी लागली. सध्या यादव जनतेशी संवाद साधण्यास बिहारमध्ये गेले आहेत. त्यांची "जेडीयू'मधूनही हकालपट्टी होण्याचे संकेत आहेत.
नितीशकुमार यांनी काल भाजपाध्यक्षांशी दिल्लीत खलबते केली. एकेकाळी शरद यादवांकडे असलेले "एनडीए'चे संयोजकपद नितीशकुमार यांना मिळण्याची चिन्हे आहेत. काल शरद यादव व अली अन्वर हे सोनिया गांधी यांच्या बैठकीला हजर होते. त्याची कुणकूण लागताच मोदींना भेटायला आलेले नितीशकुमार यांनी संसद परिसरातच "पक्षाने निर्णय घेतला आहे. ज्यांना जेथे जायचे तेथे त्यांनी खुशाल जावे,' असे फटकारले होते. नंतर ते चहापानासाठी शहांच्या घरी पोचले.

शहा यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेत नितीशकुमार यांनी चार वर्षांनंतर पुन्हा "एनडीए'त सहभागी होताना पूर्ण करणे आवश्‍यक असलेल्या तांत्रिक बाबींबद्दल चर्चा केली. त्यानंतर आज सकाळीच शरद यादव यांच्यावर पद गमावण्याची वेळ आली. काल वेंकय्या नायडू यांच्या स्वागतावेळी राज्यसभेतील "जेडीयू' नेते म्हणून भाषण करणारे वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, की शरद यादव यांची हकालपट्टी केली नसून, त्यांचे स्थान बदलले (रिप्लेस) आहे. सध्याच्या त्यांच्या हालचाली बघता तसे करणे आवश्‍यक होते. यादव यांची पक्षातून हकालपट्टी झाली, तर मात्र त्यांच्या राज्यसभा खासदारकीवरच संकट येऊ शकते. आज सकाळी शहा यांनी ट्विट करून नितीशकुमार यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली.

शिवसेनेपासून मेहबूबा मुफ्ती यांचा "पीडीपी' व अन्य पक्षांचा हिशेब केला, तर सध्या "एनडीए'मध्ये 30 हून जास्त घटकपक्ष आहे. भाजप एकटा वा आघाडीत असा तब्बल 18 राज्यांत सत्तेवर आहे. तेरा राज्यांत फक्त भाजप आहे.

Web Title: Split Wide-Open: Sharad Yadav Removed As JD-U Leader In Rajya Sabha