विषारी वायू पसरल्याने 12 हून अधिक लोक बेशुध्द; नागरिकांचा दावा | New Delhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

विषारी वायू पसरल्याने 12 हून अधिक लोक बेशुध्द? | Delhi

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) आरके पुरममध्ये कथित विषारी वायू (Poisonous Gas) पसरल्यानं दहशत माजली आहे. येथे लोकांच्या डोळ्यात जळजळ (Irritation in Their Eyes) होत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास (Difficulty In Breathing) होऊ लागल्याचे समजते. ही माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. नेमकं काय घडलं?

विषारी वायू पसरल्याने 12 हून अधिक लोक बेशुध्द?

ही घटना बुधवारी रात्री नऊ दरम्यान घडल्याचे समजते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एकता विहारच्या शेजारी असलेल्या सीआरपीएफ कॅम्प किंवा एनएसजी कॅम्पमधून विषारी वायू सोडण्यात आला होता. यानंतर येथे गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. लोक घराबाहेर पडून रस्त्यावर आले आणि उभे राहिले. दरम्यान त्यावेळी नेमकं काय घडतंय, कोणालाच काही कळत नव्हते.

हेही वाचा: एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

ती अफवा आहे की वास्तव?

लोकांनी दावा केला आहे की, येथे 12 हून अधिक लोक बेशुद्ध झाले आहेत. मात्र, अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत ती अफवा आहे की वास्तव, हे कळत नाही. लोकांनी सांगितलं की, विषारी वायूमुळे अनेक लोक बेशुद्ध झाले, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते महिपाल गौतम पोहोचले आणि त्यांनी लोकांना या विषारी वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून मास्कचे वाटप केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हेही वाचा: बनावट ओटीपी आणि कस्टमर केअर नंबर; देशातील हजारोंना कसा लावला चुना

loading image
go to top