लवकरच भारतीयांना मिळणार Sputnik लस

sputnik v covid-19 vaccine
sputnik v covid-19 vaccine

लसींच्या तुटवड्यांमुळे भारतात (India) कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Covid 19 vaccination) मोहिमेला थोडा ब्रेक लागला आहे. पण आता रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीमुळे भारतातील लसीकरणाला वेग मिळणार आहे. स्पुटनिक व्ही ही रशियाची लस पुढील आठवड्यापासून भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. निती आयोगानं गुरुवारी याबाबतची माहिती दिली.

रशियाच्या (Russia) स्पुटनिक व्ही लस एक मे 2021 रोजी भारतात दाखल झाली होती. हिमाचल प्रदेशमधील (Himachal) कसौलीतील सेंट्रल ड्रग्ज लॅबोरेटरीत या लसीच्या चाचण्या घेतल्यानंतर सरकारकडून याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. लॅबला स्पुटनिक लशीचे 100 नमुने पाठवण्यात आले होते. लशीची कार्यक्षमता, प्रभाव आणि त्याचे दुष्परिणाम या निकषांवर चाचणी घेण्यात आली. निती आयोगानं पत्रकार परिषदेत स्पुटनिक लसीच्या उपलब्धतेबाबत माहिती दिली. निती आयोगाचे व्हि. के. पॉल म्हणाले की, स्पुटनिक लस भारतात दाखल झाली आहे. पुढील आठवड्यात ती बाजारात उपलब्ध होणार आहे. रशियातून मर्यादित लसीचे डोस आले आहेत. स्पुटनिक लस पुढील आठवड्यात भारतीयांना देण्यात येणार आहे.

भारतात 1 मे 2021 रोजी स्पुटनिक व्ही लशीचे दीड लाख डोस भारतामध्ये आले आहेत. आता लशीची दुसरी खेप उद्या भारतात पोहोचणार आहे. एक मे रोजी रशियातून हैदराबादमध्ये लशीचे डोस दाखल झाले. स्पुटनिक व्ही ही भारतातील तिसरी लस असेल. सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा वापर जानेवारीपासून केला जात आहे.

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसऱीकडे लशीचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत लसीकरण मोहिमेला वेग मिळण्यासाठी स्पुटनिक व्ही लशीची मदत होणार आहे. केंद्र सरकारने 18 वर्षे वयावरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र काही राज्यांनी अद्याप 18 वर्षांवरील सर्वांसाठी लस देण्यास सुरु केलेलं नाही. लशीच्या तुटवड्यामुळे आधीच्या टप्प्यातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com