श्रीलंकेच्या नौदलाचा मच्छीमारांवर हल्ला

यूएनआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

रामेश्‍वरम - वादग्रस्त काटछथेहू बेटाजवळ मासेमारी करणाऱ्या भारतीय मच्छीमारांवर आज सकाळी श्रीलंकेच्या नौदलाने हल्ला केला. तसेच या मच्छीमारांची जाळीही नष्ट करून त्यांचा पाठलाग केला. श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मच्छीमारांच्या किमान 20 बोटी नष्ट केल्या, अशी माहिती येथील स्थानिक मच्छीमारांनी रामेश्‍वरमला परतल्यावर दिली. बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला मागे जाण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी रात्री 100 बोटीतून किमान 500 मच्छीमार हे मासेमारीसाठी गेले होते.

Web Title: Sri Lanka navy attacked fishermen

टॅग्स