दहशतवाद्यांशी लागेबांधे भोवले !

देशविरोधात काम: चार कर्मचारी निलंबित
srinagar employees Working against country Four suspended
srinagar employees Working against country Four suspended

श्रीनगर : दहशतवादी संघटनांना अर्थसाह्य आणि मदत करणाऱ्या काश्‍मीरातील चार कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेतून निलंबित करण्यात आले. ‘टेरर फंडिग’ प्रकरणातील आरोपी बिट्टा कराटे याची पत्नी असबाह उल अर्जमंद खानसह चौघांना नोकरीतून काढून टाकले. हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनच्या मुलाचा निलंबन कारवाईत समावेश आहे.

निलंबित कर्मचाऱ्यांत बिट्टाच्या पत्नीव्यतिरिक्त डॉ. मुहीत अहमद भट, काश्‍मीर विद्यापीठाचे वरिष्ठ सहायक प्रोफेसर माजिद हुसेन कादरी आणि हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीनचा मुलगा सय्यद अब्दुल मुईद याचा समावेश आहे. सल्लाउद्दीनचा मुलगा जम्मू काश्‍मीर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये व्यवस्थापक होता. चौघांवर कलम ३११ नुसार गुन्हा दाखल करत हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. या कलमानुसार सरकारला कोणत्याही चौकशीशिवाय एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार आहे.

जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा दहशतवादी फारुख अहमद दार उर्फ बिट्टा कराटेची पत्नी असबाह उल अर्जमंद खान ही २०११ च्या बॅचची जम्मू काश्‍मीर प्रशासकीय सेवेतील (जेकेएएस) अधिकारी आहे. पारपत्र तयार करताना खोटी माहिती दिल्याचा तिच्यावर ठपका आहे. त्याचबरोबर देशाला धोकादायक ठरणाऱ्या परकी नागरिकांशी संबंध असल्याचाही तिच्यावर आरोप आहे. असबाहवर जेकेएलएफसाठी पैसा गोळा केल्याचाही आरोप करण्यात आहे.

सय्यद अब्दुल मुईद हा हिज्बुलच्या म्होरक्याचा तिसरा मुलगा आहे. त्याला आता सरकारी सेवेतून काढून टाकले आहे. मुईदवर पॅम्पोर येथील जम्मू आणि काश्‍मीर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटवर तीनदा दहशतवादी हल्ला झाला तो या कटात सामील असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या मदतीने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कट्टरपंथीय करण्यासाठी त्यांच्या मनात दहशतवाद्यांचे विखारी विचार पसरविल्याचा डॉ. मुहितवर आरोप आहे. माजिद हुसेन कादरीवर लष्करे तय्यबासह अनेक दहशतवादी संघटनांबरोबर संबंध असल्याचा संशय आहे.

आतापर्यंत चाळीस कर्मचारी निलंबित

जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आतापर्यंत ४० कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यात सलाउद्दीनची दोन मुले आणि डीएसपी देवेंद्र सिंगचा समावेश आहे. श्रीनगर-जम्मू महामार्गावर सिंग यांना मोस्ट वॉंटेड दहशतवाद्यांसह पकडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com