अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला, 7 ठार 

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

सर्व यात्रेकरू गुजरातमधील; चालकाने नियमांचा भंग केल्याचा दावा 
श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर आज रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे, अनंतनाग पोलिसांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर "सीआरपीएफ'च्या जादा तुकड्या पाठविण्यात आला आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजून 20 मिनिटांनी अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी पळून जाऊ लागले. पळून जाताना त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याच वेळी अमनाथचे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरूंची एक बस त्या भागात आली. दहशतवाद्यांनी त्या बसवरही बेछूट गोळीबार केला. ही बस सोनमर्ग होऊन येत होती. यात्रेसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन बस चालकाने केल्याचा दावा पोलिसांनी केला. सायंकाळी सात वाजल्यानंतर यात्रेसाठीच्या कोणत्याही वाहनाने प्रवास करण्यास मज्जाव आहे. मात्र हा नियम चालकाने धुडकावल्याचे पोलिसांनी सांगितले. 

हल्ल्याच्या घटनेनंतर या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. 
अमरनआथ यात्रेला 29 जून रोजी सुरवात झाली आहे. हजारो भाविक रोज दर्शनासाठी जातात. सुमारे सव्वा लाख जणांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या बसगाड्यांची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या सर्व गाड्यांना सुरक्षाही पुरविण्यात येते. ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. या बसमध्ये गुजरातमधील 20 भाविक होते. 

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिला होता. त्यानुसार सुरक्षाही वाढविण्यात आली होती. तब्बल 40 हजार जवानांची नेमणूक करण्यात आली होती. टेहळणीसाठी ड्रोनचही वापर यावेळी करण्यात येत होता. मात्र त्यानंतरही हल्ला झाल्यानंतर सुरक्षेतील त्रुटी पुढे आल्या आहेत.

Web Title: srinagar national news terrorist attack on amarnath yatra