'एसआरएस'मध्ये 'पीएनबी'पेक्षाही मोठा गैरव्यवहार

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे. एसआरएस ग्रुपवर बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेपेक्षा कोट्यवधींचा गैरव्यवहार रिअल इस्टेटमधील प्रसिद्ध कंपनी असलेल्या एसआरएस ग्रुपमध्ये झाल्याचे उघडकीस आले आहे. या ग्रुपमधील 20 हजार कुटुंबीयांचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली सुमारे 30 हजार कोटी रुपये बळकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

एसआरएस ही रिअल इस्टेटमधील सर्वात मोठी कंपनी असल्याचे मानले जाते. या ग्रुपमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. यामध्ये अनिल जिंदाल यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे. एसआरएस ग्रुपवर बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे. या पाच जणांच्या अटकेनंतर पोलिस उपायुक्त विक्रम कपूर यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.

Web Title: SRS Group Huge Scam Exposed