वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Abhishek Kumar’s Struggle After Losing His Father : वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत अभिषेकने मजुरीसोबत SSC CGLची तयारी केली आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
Abhishek Kumar worked as a daily wage labourer while preparing for SSC CGL and later became a government officer

Abhishek Kumar worked as a daily wage labourer while preparing for SSC CGL and later became a government officer

esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील अभिषेक कुमार याचा संघर्ष आणि त्यातून मिळवलेले यश अनेक अडचणींवर मात करण्याचे उदाहरण ठरले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिषेकने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत शिक्षण सुरू ठेवले. दिवसा बांधकाम साईटवर रोजंदारीचे काम आणि रात्री अभ्यास करत त्याने कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) परीक्षेची तयारी केली. अखेर SSC CGL 2022 च्या अंतिम निवड यादीत त्याचे नाव आले आणि त्याची सीमाशुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक पदासाठी निवड झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com