esakal | शाळा भरविल्या, परीक्षाही झाल्या अन् 32 विद्यार्थ्यांना...
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Students

8 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

- इस्त्रायलमध्येही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

शाळा भरविल्या, परीक्षाही झाल्या अन् 32 विद्यार्थ्यांना...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूरू : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, यांसारख्या सूचना सरकारकडून दिल्या जात आहेत. त्यानंतर आता याच नियमांचे उल्लंघन करणे कर्नाटक बोर्डाला चांगलेच महागात पडले आहे. सरकारच्या नियमानुसार, बोर्ड परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्यासाठी उपस्थित असलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार त्याचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, आता त्यामधून काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. त्यानुसार देशातील बहुतांश व्यवहार, उद्योग-धंदे सुरु करण्यात आले आहेत. मात्र, शाळा, महाविद्यालये सुरु करण्यावर अद्यापही बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील परीक्षा घेणे कर्नाटक बोर्डाला चांगलेच महागात पडले आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक बोर्डाने एसएसएलसीच्या परीक्षा घेतल्या होत्या. कर्नाटक बोर्डाची ही परीक्षा दिलेल्या तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

8 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

कर्नाटकमध्ये जवळपास 8 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर 25 जूनपासून ही परीक्षा सुरू झाली होती. त्यादरम्यान या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

इस्त्रायलमध्येही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

इस्त्रायलमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर तिथे मे महिन्यात शाळा भरविण्यात आल्या होत्या. मात्र, त्याचदरम्यान शाळेतील 261 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील जवळपास 6800 विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

loading image
go to top