खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाही मिळाले शिळे अन्न; 'वंदे भारत एक्‍स्प्रेस'मधील प्रकार

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

- 'वंदे भारत एक्‍स्प्रेस'मधील प्रवाशांना शिळे अन्न पुरविल्याबद्दलच्या तक्रारी झाल्या होत्या प्राप्त. 

- त्यानंतर या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांनाही या अनुभवाला जावे लागले सामोरे. 

नवी दिल्ली : वेगवान रेल्वे असलेल्या "वंदे भारत एक्‍स्प्रेस'मधील प्रवाशांना शिळे अन्न पुरविल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री निरंजन ज्योती यांनाही या अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. 

संबंधित रेल्वेगाडीतील खानपान सेवेला अन्नाचा पुरवठा करणाऱ्या कानपूरमधील एका पंचतारांकित हॉटेलवर याबाबत कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात येईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले. संबंधित हॉटेलला दंड आकारला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. 

रेल्वेला पुरविल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची वाहतूक वातानुकूलन यंत्रणा नसलेल्या वाहनातून करण्यात येत असल्यामुळे काही अन्नपदार्थ खराब होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे आयआरसीटीसीचे समूह महाव्यवस्थापक राजेश कुमार यांनी सांगितले. उत्तर भारतात सध्या पारा 48 अंशांपर्यंत पोचला असून, त्याचाही परिणाम अन्नपदार्थांच्या वाहतुकीवर होतो आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stale food was given in Vande Bharat Express