एम.के. स्टॅलिन यांची 'DMK'च्या कार्याध्यक्षपदी निवड

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

चेन्नई- तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची द्रविड मुण्णेत्र कळघम (DMK) पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे खजिनदार पद आणि तमिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही स्टॅलिन यांच्याकडे आहे. 

स्टॅलिन यांचे वडील व तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री 92 वर्षीय एम. करुणानिधी यांची प्रकृती बिघडली असल्याने स्टॅलिन यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला पक्ष कार्यकारिणीचे सुमारे 3000 सदस्य उपस्थित होते. 

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अपवाद वगळता भारतातील एखाद्या राज्यातील विधिमंडळ निवडणुका जिंकून स्वबळावर आपली सत्ता स्थापन करण्याची विक्रमी कामगिरी करणारा DMK हा पहिला राजकीय पक्ष आहे. 

करुणानिधी यांच्या गोपाळपुरम येथील निवासस्थानी त्यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. पक्षाचे सरचिटणीस के. अनाबझगम हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 
 
Web Title: Stalin appointed DMK working president