esakal | महिन्याभरापासून तिच्यावर पाळत ठेवून होता, अखेर कुऱ्हाडीने केला हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Arrest

महिन्याभरापासून तिच्यावर पाळत ठेवून होता, अखेर कुऱ्हाडीने केला हल्ला

sakal_logo
By
शरयू काकडे

दिल्ली : साऊथ दिल्लीमधील मोती बाग परिसरात एका 16 वर्षीय मुलीवर एका 21 वर्षीय मुलाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हल्ला करणारा तरुण पिडीत मुलीला गेल्या महिन्याभरापासून स्टॉक करत होता आणि तिचा छळ करत होता. हल्ला करून तो पळून गेला होता पण हरियानामध्ये त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली.

या घडनेमुळे पिडित मुलीला मानसिक धक्का बसला असून तिने याबाबत बोलण्यास नकार दिला. दरम्यान तिच्या वडिलांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. गेल्या महिन्यात मुलीच्या वडिलांनी संबधित तरुणांला पकडले आणि त्याच्या कानाखाली लगावली होती. याच घटनेचा राग मनात धरून बाप-लेकीसोबत बदला घेण्याचा प्रयत्न त्याने केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा: देशातील 13 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे 'लय भारी'

मोतीबाग येथील जेजे क्लस्टरमध्ये ही पिडित तरुणीआपल्या कुटूंबीयांसह राहत होती आणि आरोपी तिच्या घराजवळील शास्त्री पार्कमध्ये राहत होता. अपमानाचा बदला घेण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमरास, तरुणी तिच्या घराच्या दिशेना चालत जात असताना आरोपीने तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. तरुणीच्या डोक्याला थोडी दुखापत झाली. दरम्यान स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस कंट्रोलरुमला फोन केला आणि मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिचे ऑपरेशन झाले पण मंगळवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

पिडीत मुलीचा जबाब न मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान स्थानिक आणि मुलीच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखले केला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळ काढला होता, तो घराच्या आसपास परिसरामध्ये पोलिसांना सापडला नाही.

पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर पालवाल येथे बहिणीच्या घरी आरोपी सापडला. खूनाच्या गुन्ह्याअंतर्गत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

loading image