esakal | लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?
sakal

बोलून बातमी शोधा

लिएंड पेस-किम शर्मा

लिएंडर पेस युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडच्या प्रेमात?

sakal_logo
By
दीनानाथ परब

पणजी: प्रसिद्ध क्रीडापटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये (bollywood celebrity) प्रेमसंबंध असणे अजिबात नवीन नाही. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूडच्या नायिकांसोबत संसार थाटला आहे. आता या यादीत आणखी एका जोडीची भर पडली आहे. टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Paes) आणि अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) परस्परांच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे. गोव्यामध्ये (goa) ते एकत्र सुट्टयांचा आनंद घेत असल्याचे फोटो समोर आले आहेत. गोव्यामधील रेस्टॉरंटने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. (Are Leander Paes dating yuvraj singh ex girlfriend Kim Sharma Goa holiday photos dmp 82)

लिएंडर पेस आणि किम शर्मा पहिल्यांदा एकत्र दिसलेले नाहीत. मागच्या महिन्यात छायाचित्रकारांनी दोघांना वांद्रयामध्ये एकत्र असताना गाठले होते. आता दोघे पहिल्यांदाच एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. या फोटोमध्ये लिएंडर आणि किमसोबत काही श्वानही दिसत आहेत. एकत्र भोजनाचा आस्वाद घेतानाचाही फोटो हॉटेलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 8 कोटींच्या कारचा मालक असलेल्या शिवसैनिकावर 35 हजाराच्या वीजचोरीचा आरोप

लिएंडर पेस आणि किम शर्मा दोघांची यापूर्वी प्रेम प्रकरण होती. लिएंडर रेहा पिल्लाई सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तिच्यापासून त्याला एक मुलगी सुद्धा आहे. किम याआधी अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. युवराज सिंग बरोबर तिच्या प्रेमसंबंधांची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

किम शर्माने २००० साली शाहरुख खानच्या 'मोहब्बते' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती फिदा आणि अन्य काही चित्रपटांमध्ये दिसली. लिएंडर पेस भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू आहे. लवकर तो मेहश भूपती सोबत एका OTT प्लॅटफॉर्मसाठी एकत्र काम करणार आहे. लिएंडरनेही २०१३ साली 'राजधानी एक्स्प्रेस' चित्रपटात अभिनय केला आहे.

loading image