धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 भाविकांचा मृत्यू | Stampede at Mata Vaishno Devi Bhawan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stampede at Mata Vaishno Devi Bhawan
धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 भाविकांचा मृत्यू

धक्कादायक! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी, 12 भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir, Katra) माता वैष्णो देवी मंदिरातून धक्कादायक बातमी समोर आली असून मंदीर परिसरात असलेल्या भवनात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या घटनेत तब्बच 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 13 भाविक जखमी झाल्याचं समजतंय. ही घटना पहाटे 2.45 च्या सुमारास घडल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. (Stampede at Mata Vaishno Devi Bhawan)

जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही कारणावरून झालेल्या वादातून भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. कटरा हॉस्पिटलचे बीएमओ डॉ. गोपाल दत्त यांनी मृत्यूबद्दलची माहिती दिली. सध्या जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी झाली.

हेही वाचा: कालीचरणला 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी

दरम्यान, जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवल्याचे सांगितले. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका भाविकाचा समावेश आहे. इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jammu And Kashmir
loading image
go to top