M.S.Swaminathan: IPS ची नोकरी सोडली आणि स्वामिनाथन हरितक्रांतीचे जनक बनले..जाणून घेऊया भारतरत्नांविषयी

स्वामीनाथन यांची भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणना केली जाते, आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 60 च्या दशकात भारतात हरित क्रांती यशस्वी झाली.
M.S.Swaminathan
M.S.SwaminathanEsakal

एम.एस. स्वामिनाथन यांनी आपल्या देशाला दुष्काळातून बाहेर काढण्यात आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्वामिनाथन यांचे पूर्ण नाव मनकोम्बू सांबशिवन स्वामीनाथन, यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम येथे झाला. त्यांनी गव्हाचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्यांनी त्या काळात केलेल्या कामामुळे शाश्वत विकासाला चालना मिळाली.

हरितक्रांतीचे जनक का मानले जाते ?

स्वामीनाथन यांची भारतातील महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून गणना केली जाते आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे 60 च्या दशकात भारतात हरित क्रांती यशस्वी झाली. म्हणूनच स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेतकऱ्यांना चांगले आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळाले पाहिजे. हाच हेतू डोळयासमोर ठेवून स्वामीनाथन यांनी आपली वाटचाल सुरु केली.

M.S.Swaminathan
कोरडवाहू शेतीचा हरितक्रांती दूत

देशातील शेतकरी जर का सुधारला तर आपला देश समृद्ध होऊन अर्थव्यवस्थेत महत्वांची भूमिका बजावू शकेल. असे स्वामीनाथन यांचे मत होते.सुरुवातीला स्वामिनाथन यांनी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू केला, पण नंतर त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. स्वामिनाथन यांचे शेतीप्रेम इतके होते की त्यांनी आपल्या लागलेली IPS ची नोकरी देखील सोडली होती.

स्वामिनाथन एकदा म्हणाले होते की, The word 'impossible' exists mainly in our minds and that given the requisite will and effort, great tasks can be accomplished. याचा अर्थ असा होतो की 'अशक्य' हा शब्द प्रामुख्याने फक्त आपल्या मनात असतो पण जर तुमच्या कृतीत इच्छाशक्ती आणि मेहनत करायची तयारी असली तर तुम्हाला मोठी कामे पूर्ण करता येतात.

M.S.Swaminathan
सोलापूर : घरची शेती सांभाळत उपजिल्हाधिकारी झालेले मिनाज मुल्ला

60 च्या दशकात, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 18 वर्षांनी, अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय घट होत होती आणि सोबतच देशात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती.अशा स्थितीत भारतासारख्या विशाल देशाला दुष्काळापासून वाचवण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला गती मिळावी, म्हणून स्वामिनाथन यांनी अशा अवघड परिस्थितीतही भारताला या समस्येतून मुक्त करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती.

स्वामिनाथन यांनी नेमक कोणत काम केलं ?

स्वामिनाथन हे आपल्या देशातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी प्रथम गव्हाचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधून काढले आणि त्या वाणांची शेतकर्‍यांना ओळख करून दिली. त्यांना शेतकर्‍यांचा कैवारी देखील म्हटले जाते.

स्वामिनाथन यांच्याविषयी 'या' आठ गोष्टी:

1) 1960 च्या दशकात भारत प्रचंड दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्यावेळी एम.एस. स्वामिनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांच्या सहकार्याने गव्हाचे HYV बियाणे विकसित केले.

2) स्वामीनाथन यांच्या टिमने विकसित केलेल्या बीजांमुळेच भारतात हरितक्रांती झाली. या गोष्टीमुळेच एम.एस. स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते.

3) स्वामिनाथन यांनी प्राणीशास्त्र आणि कृषी विज्ञान या दोन्ही विषयांत पदवी प्राप्त केली. याशिवाय त्याच्याकडे 50 हून अधिक सन्मानित अशा डॉक्टरेट पदव्या आहेत. भारत सरकारने 1967 आणि 1972 मध्ये त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

4) 1943 च्या बंगालचा दुष्काळ आणि देशात अन्नाची कमतरता जाणवल्यानंतर स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना मिळाले आहे.

5) स्वामिनाथन यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक (1972-1979) आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (1982ते 1988 ) म्हणून काम केले.

6) पुढे ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव राहिले होते. 1986 साली स्वामीनाथन यांना अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

7) 1988 मध्ये एम.एस. स्वामिनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले.

8) 1999 मध्ये, टाईम मासिकाने M.S. 20 व्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत स्वामीनाथन यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com