लोकलच्या तिकिटांवर मराठीतून स्थानक नावे

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

मध्य, पश्‍चिम रेल्वेची आजपासून सुरवात

नवी दिल्ली: मराठी भाषेला अभिजात दर्जाचे घोंगडे दिल्लीदरबारी पडून असले. तरी मध्य व पश्‍चिम रेल्वे उद्याच्या महाराष्ट्रदिनी (ता. 1 मे) मुंबईतील उपनगरी लोकल प्रवाशांना तिकिटांवर मराठीतूनही स्थानकांची नावे छापून महाराष्ट्र दिनाची भेट देणार आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. तिकिटांवर पहिल्याप्रमाणे हिंदी व इंग्रजीत नावे असतीलच.

लोकल गाड्यांमध्ये होणारी स्थानकांची उद्‌घोषणा मराठीत करण्याची पद्धत यापूर्वीच सुरू झाली आहे. त्याला आता तिकिटांवरही मराठी झळकण्याची जोड मिळणार आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याने ही योजना मराठी प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल, असे रेल्वेचे म्हणणे आहे. मराठीसह तीन भाषांत तिकिटांवरील नावे छापण्याची कल्पना रेल्वे माहिती यंत्रणा केंद्राने (सीआरआयएस) प्रत्यक्षात आणली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वे अशीच योजना गुजरातीसाठीही राबविणार आहे. कर्नाटकने कन्नड भाषेत तिकिटांवरील माहिती छापण्याचा प्रयोग देशात सर्वप्रथम सुरू केला. पाठोपाठ काही राज्यांनी यापूर्वीच स्थानिक रेल्वेसेवांची तिकिटे त्या त्या भाषांत छापण्याचा प्रयोग सुरू केला आहे. मुंबई लोकलमध्ये मराठीतून स्थानकांची नावे छापण्याची भर त्यात पडणार आहे.

Web Title: station names in marathi on local tickets