देश
स्टीव्ह जॉब्सची पत्नी बनली साध्वी, गुरुने दिलं आपलं गोत्र अन् बदललं नाव
Maha Kumbh 2025 : जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक राहिलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यासुद्धा महाकुंभमध्ये संन्यासी म्हणून सहभागी झाल्या आहेत.
महाकुंभ २०२५ ची तयारी पूर्ण झाली असून कल्पवास ते स्नानासाठी भारतासह जगभरातून लोक प्रयागराजमध्ये येत आहेत. जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक राहिलेल्या स्टीव्ह जॉब्ज यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यासुद्धा महाकुंभमध्ये संन्यासी म्हणून सहभागी झाल्या आहेत. त्यांना गुरु निरंजनी पीठाधीश्वर स्वामी कैलाशनंद गिरी यांच्याकडून दीक्षा मिळाली. लॉरेन्स जॉब यांनी यावेळी नवं नावही देण्यात आलंय.

