कश्मीरमधील अल्पवयीनांवरील गुन्हे मागे घेणार - राजऩाथ सिंह

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरी गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. दहशतवादाविरोधी कारवाईच्या देण्यात आलेल्या स्थगितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसाच्या जम्मू काश्मीर दौऱयावर आहेत, त्यावेळी ते बोलत होते. 

जम्मू काश्मीर - जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या अल्पवयीन मुलांवरी गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. दहशतवादाविरोधी कारवाईच्या देण्यात आलेल्या स्थगितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन दिवसाच्या जम्मू काश्मीर दौऱयावर आहेत, त्यावेळी ते बोलत होते. 

या निर्णयाने काश्मिरमध्ये पूर्णपणे बदल घडून येईल. काश्मीरचे भविष्य बदलेल. मुलांना चुकीच्या वाटेवर घेऊऩ जाणे सोपे असते. परंतु त्यांना चांगला मार्ग दाखवणे अवघड असते. परंतु, हे कार्य करायला हवे म्हणूनच आम्ही अल्पवयीन मुलांविरोधातील दगडफेकीसंदर्भात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

श्रीनगरमध्ये स्पोर्ट्स कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी खेळाचे महत्व सांगताना खेळ तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो असेही प्रतिपादन केले. यावेळी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती याही उपस्थित होत्या.

Web Title: Stone-pelting cases against minors to be withdrawn, says Rajnath Singh