गोवा - घरांवर दगडफेक, पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

मुरगाव (गोवा) : गेल्या काही दिवसांपासून खारेवाडा येथील घरांवर मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेक करण्याचे प्रकार वाढले असून या प्रकरणी वास्को पोलिसांकडे तक्रार करून सुध्दा कोणतीच कारवाई केली जात नाही, उलट दगडफेक करणाऱ्यांना लोकांनीच पकडून पोलीसांच्या स्वाधीन करा असा अजब सल्ला वास्को पोलिसांनी दिल्याचे तेथील स्थानिक लोकांनी उप अधीक्षक सुनीता सावंत यांची भेट घेऊन सांगितले.

वास्को शहराला लागून असलेल्या खारेवाडा भागात मासेमारी लोकांची कौलारू घरे आहेत, तेथे गेल्या काही दिवसांपासून मध्य रात्रीच्या सुमारास दगडफेक करण्याचे प्रकार वाढले आहेत. गाढ झोपेत असताना अचानक ही दगडफेक केली जात आहे. या प्रकरणी तेथील रहिवाशांनी वास्को पोलिसांकडे रितसर तक्रार करून सुद्धा पोलिस कोणतीच कारवाई करीत नाही. त्यामुळे अखेर तेथील रहिवाशांनी वास्को पोलिस उप अधीक्षक सुनीता सावंत यांची भेट घेऊन त्यांना दगडफेक विषयी कल्पना दिली, तसेच वास्को पोलिस तक्रारी ची दखल घेत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

दरम्यान, सावंत यांनी या प्रकरणी स्वता लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले आहे.
  
Web Title: stone pelting on homes no action from police in goa