
अडीच दिवसांच्या खासदारांना निवृत्तिवेतन मिळते, परंतु १३ डिसेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे संरक्षण करणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांचे निवृत्तिवेतन बंद केले आहे, अशा शब्दात कॉन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्सेस वेल्फेअर असोसिएशन्स संघटनेने खदखद व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - अडीच दिवसांच्या खासदारांना निवृत्तिवेतन मिळते, परंतु १३ डिसेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे संरक्षण करणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांचे निवृत्तिवेतन बंद केले आहे, अशा शब्दात कॉन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरामिलिटरी फोर्सेस वेल्फेअर असोसिएशन्स संघटनेने खदखद व्यक्त केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संसदेवर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्याच्या स्मृतीदिनानिमित्त काल (ता. १३) संसद भवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये या हल्ल्यात प्राणार्पण करणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर या निमित्त निमलष्करी दलांच्या निवृत्त जवानांच्या संघटनेनेही काल परिसंवाद घेऊन मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. संघटनेचे सरचिटणीस रणबीरसिंह आणि खजिनदार व्ही. एस. कदम यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
'मोदी सरकारसाठी शेतकरी 'खलिस्तानी' तर उद्योगपती...'
कदम यांनी म्हटले, की गेल्या सहा वर्षात निमलष्करी जवानांच्या कल्याणासाठी काहीही झाले नाही.निवृत्त निमलष्करी जवानांना कॅन्टिनमधून मिळण्यावर घातलेला प्रतिबंध हटवावा, निमलष्करी दलांच्या जवानांनाही वन रॅन्क वन पेन्शन, जुने निवृत्तिवेतन पुन्हा द्यावेे, अशी मागणीही यावेळी केली.
Edited By - Prashant Patil