हेल्मेट न घातल्याने कारवाई करणाऱ्या पोलिसाला महिलेकडून मारहाण

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने अनेकदा वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, अशाचप्रकारची कारवाई करताना वाहतूक पोलिसाला एका महिलेने मारहाण केली. ही घटना दिल्लीतील मायापूरी येथे घडली.

नवी दिल्ली : दुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने अनेकदा वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, अशाचप्रकारची कारवाई करताना वाहतूक पोलिसाला एका महिलेने मारहाण केली. ही घटना दिल्लीतील मायापूरी येथे घडली.

मारहाण करणारे दोघेजण दारू प्यायल्याचे समोर आले. दारूच्या नशेतच त्यांनी हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. याबाबत संबंधित वाहतूक पोलिसाने तक्रार दाखल केली असून, या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिला आणि पुरुष हे दोघे दुचाकीवरून विनाहेल्मेट प्रवास करत आहेत.  

महिला आणि पुरुष हे दोघे विनाहेल्मेट प्रवास करत असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसाने या दोघांना पाठलाग करत रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित महिलेने धावत्या गाडीवरून उडी घेत वाहतूक पोलिसाशी वाद घातला. यातून झालेल्या बाचाबाचीनंतर महिलेने पोलिसाला मारहाण केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stopped for riding without helmet Delhi woman hits cop