
भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर गेल्या 4 महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. रेबिज झाल्यानं तिच्यावर बंगळुरूतील रुग्णालयात उपचार सुरू होते. खदिरा बानो असं चिमुकलीचं नाव आहे. दावणगिरी इथं ती आई-वडिलांसोबत राहत होती. एप्रिल महिन्यात घराबाहेरच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला होता.