esakal | सावधान ! हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना विषाणूचे प्रतिकात्मक छायाचित्र

सावधान ! हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. दररोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. संपूर्ण जग यामुळे त्रस्त झाले आहे. जगातील अनेक देशांनी यासाठी वेगवेगळ्या लशी विकसित केल्या आहेत. यातच एक धक्कादायक बाब संशोधनातून समोर आली आहे. हवेतूनही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. शुक्रवारी लँसेटने प्रकाशित केलेल्या एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडाशी निगडीत सहा तज्ज्ञांच्या अभ्यासातून हे समोर आले आहे. हा विषाणू मुख्यतः हवेतून पसरत असल्यामुळे यावरील उपचारात अपयश येत असल्याचे या तज्ज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेतील कोलरॅडो बाऊल्डर विद्यापीठातील जोस लुई जिमेनजे म्हणाले की, हा विषाणू हवेच्या माध्यमातून पसरण्याचे अनेक पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग संघटनांनी या विषाणूच्या प्रसाराचे वैज्ञानिक पुरावे स्वीकारावेत, ज्यामुळे विषाणूचा हवेद्वारे प्रसार कमी करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाऊ शकेल.

हेही वाचा: शोलेचा डायलॉग मारलेल्या भाजप नेत्याला नोटीस

संशोधकांनी WHO ला लिहिले होते पत्र

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी काही अभ्यासकांनी कोविड-19 हवेद्वारे पसरतो असे म्हटले होते. परंतु, यावर समग्र वैज्ञानिक अभ्यास होऊ शकला नाही. मागील वर्षी जुलैमध्ये 32 देशातील 200 हून अधिक शास्त्रज्ञांनी डब्ल्यूएचओला पत्र लिहिले होते आणि त्यांनी हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होतो सांगितले होते. त्याचबरोबर छोटे छोटे कणही लोकांना संक्रमित करु शकतात, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.

हेही वाचा: देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येने गाठला विक्रमी टप्पा

पुरावे मिळाले

ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्त्वाखालील एका पथकाने एका प्रकाशित संशोधनाची समीक्षा केली आणि हवेच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दाव्याचे समर्थन करताना पुरावे म्हणून 10 कारणेही सांगितले. संशोधकांनी मागील वर्षी सुपर स्प्रेडर घटनांचा उल्लेख करताना अमेरिकेचे उदाहरण दिले. यामध्ये 53 लोक एक एकल संक्रमिक प्रकरणात बाधित झाले होते. त्यांनी म्हटले की, SARS-CoV-2 चा संसर्ग दर बाहेरच्या तुलनेत खूप अधिक आहे आणि इनडोअर व्हेंटिलेशनद्वारे संसर्ग कमी होतो. तज्ज्ञांच्या मते SARS-CoV-2 हवेत आढळून आला आहे. प्रयोगशाळेत SARS-CoV-2 विषाणू किमान 3 तासांपर्यंत हवेत संसर्गजन्य परिस्थितीत राहिला.

हेही वाचा: तुघलकी लॉकडाऊन हेच कोरोनाविरोधी धोरण; राहुल गांधी यांची केंद्रावर टीकेची झोड

loading image
go to top