दिल्लीत धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 एप्रिल 2018

अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

नवी दिल्ली : देशात बलात्काराच्या घटना सातत्याने घडत आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'निर्भया' बलात्कार आणि हत्याप्रकरणानंतर आता पुन्हा एकदा तशाच प्रकारची घटना घडली. अकरावीत शिकणाऱ्या मुलीवर धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. 

पीडित मुलीच्या ओळखीतील तिघांनी बलात्कार केला. यामध्ये पीडित मुलीच्या परिचयातील एक विद्यार्थी, नातेवाईक आणि आणखी एकाचा समावेश आहे. या तिघांनी धावत्या कारमध्ये तब्बल 11 तास सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर पहाटे दीडच्या सुमारास पीडित मुलीला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. 

बलात्काराची ही घटना रविवारी (ता. 18) रोजी घडली असून, काल (सोमवार) उघडकीस आली. यातील आरोपींविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला पडकण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: Student rape gang rape for 11 hours in Running car