पालकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कोप्पल (कर्नाटक)- एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा सांभाळ करणाऱया पालकाने बलात्कार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कोप्पल (कर्नाटक)- एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा सांभाळ करणाऱया पालकाने बलात्कार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसरीकट्टे या गावात राहणाऱया क्रिष्णप्पा याने एका मुलीचा सांभाळ करण्यासाठी आपल्याकडे ठेवले होते. पंधरा वर्षांची मुलगी सरकारी शाळेत शिक्षण घेत होती. क्रिष्णप्पाची पत्नी अंध आहे. काही महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत त्याने विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. याबाबतची कोणाला माहिती सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. परंतु, यामधून ती गर्भवती राहिल्याने ही माहिती पुढे आली. गावामध्ये चर्चा होऊ लागल्यानंतर नागरिकांनी तक्रार दाखल केली. या घटनेचा तपास केल्यानंतर क्रिष्णप्पाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: student raped by her guardian in Karnataka