school uniform : विद्यार्थ्यांना गणवेशात मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉलमध्ये प्रवेश देऊ नका; अन्यथा कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

school student News

विद्यार्थ्यांना गणवेशात मॉल, सिनेमा हॉलमध्ये प्रवेश देऊ नका; अन्यथा कारवाई

कुशीनगर : उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधील मॉल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आणि पार्क चालकांना डीआयओएसने (DIOS) शाळेच्या गणवेशात (School Dress) येणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) प्रवेश न देण्याचे आवाहन केले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बाल संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

डॉ. शुचिता चतुर्वेदी, उत्तर प्रदेश राज्य बाल संरक्षण आयोगाचे सदस्य यांनी असे निर्देश दिले आहेत की, आयोगाने बालकांच्या हक्कांचे उल्लंघन आणि संरक्षण आयोगाच्या तरतुदींच्या अंतर्गत संरक्षणाच्या अतिक्रमणाची स्वतःहून दखल घ्यावी. बाल हक्क कायदा २००५ अंतर्गत चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी माहिती जिल्हा शालेय निरीक्षक रवींद्र सिंह यांनी दिली.

या क्रमाने उद्याने, मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आदी विविध सार्वजनिक ठिकाणच्या चालकांना शाळेच्या वेळेत कोणत्याही विद्यार्थ्यांना (Student) शालेय गणवेशात प्रवेश (School Dress) न देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शालेय वेळेत शाळेत न जाणे आणि उद्याने, मॉल्स (Cinema Halls), रेस्टॉरंट (Restaurant) आदी सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ जात असल्याने अप्रिय घटना घडण्याची शक्यता असल्याचे डीआयओएसने म्हटले आहे.

कुशीनगरमधील सर्व सार्वजनिक ठिकाणे जसे की उद्याने, मॉल्स, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल आदी चालकांना शाळेच्या वेळेत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेच्या गणवेशात प्रवेश देऊ नये असे आवाहन केले. अन्यथा, बालहक्क संरक्षण आयोग कायदा २००५ च्या कलमांच्या तरतुदींनुसार, अधिकारांचे उल्लंघन आणि मुलांच्या संरक्षणाच्या अतिक्रमणाची स्वतःहून दखल घेऊन उत्तर प्रदेश राज्य बाल संरक्षण आयोगाद्वारे तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाईल. यासाठी संबंधित संचालक जबाबदार असतील.