

Principal’s Insensitive Remark After Student’s Self Immolation Attempt Sparks Anger
Esakal
कला शाखेत पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं कॉलेज कॅम्पसमध्येच स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. फी न भरल्यानं परीक्षेला बसू देण्यास मनाई केल्यानं त्यानं हे पाऊल उचललं. यात तो ७० टक्क्यांपेक्षा भाजला असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.