निपाणीतून जादा बसेससाठी पट्टणकुडी येथे रास्तारोको

निपाणीतून जादा बसेससाठी पट्टणकुडी येथे रास्तारोको

पट्टणकुडी - निपाणी आगारातून अनियमित बससेवा सुरू आहे. रिकामी असूनही बस थांबविण्यात येत नाही. सकाळच्या सत्रात गर्दी असल्याने 8 ते 11 या वेळेत जादा बसची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे सोमवारी (ता. 1) येथे रास्तारोको करण्यात आला. या आंदोलनात शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. 

रास्ता रोकोमुळे निपाणी-चिक्कोडी मार्गावरील वाहतूक सकाळी 8.30 ते 9.30 यावेळेत विस्कळीत झाली. विद्यार्थ्यांनी सर्व बस अडवून ठेवल्या होत्या. यावेळी खडकलाट पोलिस स्थानकाचे फाैजदार बी. जी. सुब्बरमठ यांनी मध्यस्थी करून निपाणी आगराचे अधिकारी एम. बी. बाळनाईक यांना बोलावून चर्चा केली.

बाळनाईक यांनी बुधवारपासून निपाणी-खडकलाट बस पट्टणकुडी व्हाया सुरू करून गैरसोय टाळण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व चालक व वाहकांना बस थांबविण्याची सूचना करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर बससेवा सुरळीत सुरू झाली. आज सोमवारी वाळकी येथील श्री. महादेव यात्रा असल्याने रास्ता रोकोचा फटका भाविकांना देखील बसला.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भागण्णा पाटील, दीपक टाकळे, प्रणव देसाई, विनायक कांबळे, हृतिक पाटील, स्वप्नील कोरवी, दर्शन ठाणे, सिद्धू धनगर, संतोष ठाणे, ओंकार घस्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com