esakal | शिक्षकाचे टॉवेलमध्ये ऑनलाईन क्लासेस; विद्यार्थ्यांनी छेडलं आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

sexual harassment

चेन्नईतील एका शिक्षकाने ऑनलाईन क्लासेसदरम्यान अश्लिल वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी याप्रकरणी ऑनलाईन कॅम्पेन सुरु केले असून शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

शिक्षकाचे टॉवेलमध्ये ऑनलाईन क्लासेस; विद्यार्थ्यांनी छेडलं आंदोलन

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

चेन्नई- चेन्नईतील एका शिक्षकाने ऑनलाईन क्लासेसदरम्यान अश्लिल वर्तन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी याप्रकरणी ऑनलाईन कॅम्पेन सुरु केले असून शिक्षकाविरोधात कारवाईची मागणी केली आहे. शिक्षकाने टॉवेलमध्ये ऑनलाईन क्लास घेतल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. याशिवाय शिक्षकाने विद्यार्थीनींना अश्लिल मेसेज पाठवल्याचा आणि त्यांच्या डिस्पे फोटोवर खराब वक्तव्य केल्याचं सांगण्यात आलंय. शाळेच्या मॅनेजमेंटकडे तक्रार करुनही शिक्षकाविरोधात काहीही कारवाई करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आंदोलन छेडलंय. (Students outrage as teacher at top Chennai school sexually harasses girls, sends lewd texts)

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनीही शिक्षकावर गंभीर आरोप केले असून त्यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला असल्याचं म्हटलं आहे. शिक्षक गेल्या 20 वर्षांपासून संस्थेत अकाऊंट आणि बिजनेस स्टडीज शिकवत आला आहे. यादरम्यान, त्याने अनेकदा अश्लिल कमेंट केले असल्याचं माजी विद्यार्थ्यांनी म्हटलंय. शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोपही माजी विद्यार्थीनींनी केला आहे.

हेही वाचा: ओडिशाला 600, बंगालला 400 कोटी मदत; राज्यांसोबत भेदभाव!

शिक्षकाच्या तत्काळ सेवेतून काढून टाकण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय, शिक्षकाची चाईल्ड प्रोटेक्शन कमिटी आणि जेन्डर सेन्सेटिव्हिटी कमिटीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशीची मागणी करण्यात आलीये. विरोधात तक्रार केल्यास कमी ग्रेड देण्याची धमकी शिक्षकाने दिल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. याप्रकरणी डीएमके खासदार कानीमोझी यांनी लक्ष घातले असून चौकशी केली जाईल असं आश्वासन दिलंय. तसेच जे याप्रकरणात दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा: पूर्वनोंदणीशिवाय लस, वशिलेबाजांचं फावणार का?

डीएमकेचे दक्षिण चेन्नईचे खासदार थमीझाची थांगापांडियन यांनी आरोप गंभीर असल्याचं म्हटलंय. दोषी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. शाळा व्यवस्थापनाने दोषीला पाठिशी घालण्यापेक्षा कठोर कारवाई करायली हवी, असं ट्विट त्यांनी केलंय. दरम्यान, याप्रकरणी वातावरण तापलं असून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

loading image
go to top