विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार न्याहारी - एम.के. स्टॅलिन

द्रमुक सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त स्टॅलिन यांची घोषणा : बसमधून केला प्रवास
Students will get breakfast school Tamil Nadu cm M K Stalin
Students will get breakfast school Tamil Nadu cm M K Stalinsakal
Updated on

चेन्नई : तमिळनाडूत समान विकास, समानता, सक्षमीकरण हे द्रविडियन मॉडेल लागू करण्याचे आश्‍वासन देत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी द्रमुक सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत न्याहारीसह पाच योजना जाहीर केल्या. तत्पूर्वी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मरिना बीचवर माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी आणि द्रमुकचे संस्थापक सी.एन.अण्णादुराई यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. यादरम्यान सार्वजनिक बसमधून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला.

द्रमुकने ७ मे २०२१ रोजी तमिळनाडूच्या २३४ सदस्यीय विधानसभेत १३३ जागा जिंकल्या आणि सत्ता मिळवली. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विधानसभेत स्वत:हून सरकारच्या वर्षपूर्तीची माहिती देताना सांगितले की, याच दिवशी गेल्यावर्षी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. लोकांनी भरभरून मतदान केले आणि विश्‍वास व्यक्त केला. त्यांचे स्वप्न, आशा आणि आकांक्षा पूर्ण होतील या अपेक्षेने द्रमुकला त्यांनी निवडून दिले. द्रमुकने निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांपैकी ७० टक्के आश्‍वासने एका वर्षाच्या आतच पूर्ण केली. आगामी काळात सर्वच क्षेत्रातील लोकांची स्वप्न पूर्ण होतील असा विश्‍वास आहे. यावेळी स्टॅलिन यांनी पाच घोषणा केल्या. यात सरकारी शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना न्याहारी, दर्जेदार शाळा, शाळेत आरोग्य तपासणी, शहरी भागात ‘पीएचसी’ सारखे केंद्र आणि ‘आपल्या मतदारसंघात मुख्यमंत्री’ या योजनांचा समावेश आहे.

स्टॅलिन यांचा बसमधून प्रवास

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आज चेन्नईच्या महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास केला आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिला प्रवाशांशी चर्चा केली. स्टॅलिन यांनी करुणानिधी मेमोरियलहून अण्णा मेमोरियलपर्यंत सरकारी बसने प्रवास केला. बस क्रमांक २९ सी (बिझंट नगर आणि पेरामबूर) मध्ये राधाकृष्ण सलाई येथून बसमध्ये बसले. त्यांनी सात मिनिटांचा प्रवास केला. स्टॅलिन हे २९-सी क्रमांकाची बस कधीही विसरू शकत नाहीत. कारण त्यांनी शालेय जीवनात याच क्रमाकांच्या बसमधून प्रवास केला आहे.

न्याहारी योजना

सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनची व्यवस्था केल्यानंतर आता सकाळी मोफत नाश्‍ता देण्याची घोषणा केली. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सकाळच्या वेळी गडबडीत शाळेत जावे लागते. त्यामुळे त्यांना नाश्‍ता करण्यास वेळ मिळत नाही किंवा अर्धवट सोडून शाळेत येतात. तसेच काही विद्यार्थी कौटुंबीक पार्श्वभूमीमुळे नाश्‍ता करू शकत नाही. तसेच काही जण शाळेत दूरवरून येतात आणि यासाठी ते लवकर घराबाहेर पडतात. त्यामुळे स्टॅलिन सरकारने मुलांसाठी नाश्‍त्याची सोय केली आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने ही योजना लागू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com