Quit Smoking
Quit Smoking

Quit Smoking: पुरुषांच्या तुलनेत महिलांना धुम्रपान सोडणे जड का जातं? अभ्यासातून आलं समोर

Nicotine Addiction: अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री आणि मोलेक्लुलर बायोलॉजी जर्नलध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

नवी दिल्ली- पुरुषांपेक्षा महिलांना सिगरेट सोडणे अधिक कठीण जाते असा निष्कर्ष युनिव्हर्सिटी ऑफ केंटकीतील एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. संशोधकांनी असं सुचवलंय की, महिलांमधील सेक्स हॉर्मोन, इस्ट्रोजेन हे निकोटिनचे व्यसन लागण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. (Study Explains Why Women May Struggle More To Quit Smoking)

संशोधकांना असं आढळलंय की, महिलांना निकोटिनचे व्यसन पुरुषांपेक्षा लवकर लागते, तसेच त्यांना हे व्यसन सोडणे खूप जड जाते. संशोधन टीमचे नेतृत्व करणाऱ्या सॅली पॉस यांनी ही असमानता दाखवली आहे. मेंदुशी संबंधित असलेले ऑल्फॅक्टोमेडिन प्रथिनांचा याच्याशी संबंध असल्याचा शोध त्यांनी लावला आहे.

Quit Smoking
No Smoking Day : ना बेचैनी, ना अस्वस्थता; सोप्या पद्धतीने सोडा सिगरेट

निकोटिन हे ऑल्फॅक्टोमेडिनची निर्मिती कमी करण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे इस्ट्रोजेन ऑल्फॅक्टोमेडिनला जास्त चालना देत असते. या तिघांमधील परस्परसंपर्काचा अभ्यास केल्यास महिलांना सिगरेट सोडण्यासाठी जास्त का झगडावे लागते याचा उलगडा होईल, असं सॅली पॉस म्हणाल्या.

अमेरिकन सोसायटी फॉर बायोकेमिस्ट्री आणि मोलेक्लुलर बायोलॉजी जर्नलध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. महिलांमधील या समस्येशी तोंड देण्यासाठी नवी उपचार पद्धती आवश्यक असल्याचं या जर्नलमध्ये म्हणण्यात आलं आहे. या नव्या संशोधनामुळे महिलांमधील धुम्रपानाची सवय सोडवता येईल असंही यात म्हणण्यात आलंय.

सॅली पॉस या प्रोफसर टेरी डी हिंड्स ज्युनियर यांच्या नेतृत्त्वामध्ये काम करत आहेत. त्या म्हणाल्या की, आमच्या अभ्यासात असं आढलंय की महिलांना निकोटिनचे व्यसन अधिक लागते. त्यांना सिगरेट सोडण्यासाठी पुरुषांपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. महिला निकोटिबाबत अधिक संवेदनाक्षम का आहेत याचा शोध घेऊन ही असमानता दूर करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Quit Smoking
Salman Khan Smoking: भाईजानला तलफ सुटली आणि कॅमेरासमोर सिगरेट ओढली, Bigg Boss Ott 2 चा व्हिडीओ व्हायरल

निकोटिच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या महिलांचे आयुष्य सुधारण्याचा आमचा प्रयत्न आहे. इस्ट्रोजनच्या सहभागाचा आणि निकोटिनचा सहसंबंध समजून आल्यास यासंबंधी औषध निर्मितीचा मार्ग मोकळा होईल. नवीन औषध महिलांचे जीवन सुखकर करेल आणि निकोटिन सोडण्यासाठी मदत करेल अशी आशा आहे, असं सॅली पॉस म्हणाल्या. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com