...तरीही 95 कोटी भारतीय इंटरनेटपासून दूरच

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- जगात सर्वांत स्वस्त मोबाईल डेटा प्लॅन उपलब्ध असणाऱ्या देशांमध्ये भारत आघाडीवर असूनदेखील तब्बल 95 कोटी भारतीय इंटरनेटपासून अद्याप दूरच आहेत, अशी आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे. असोचाम आणि डेलोलाईटने संयुक्त अभ्यासानंतर प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. 

"भारतात इंटरनेटचा प्रसार वाढत आहे. तथापि, डिजिटल साक्षरता वाढवण्याची गरज असून, येथे डिजिटल साक्षरता वाढवून इंटरनेट वापरकर्ते व इतरांमधील दरी दूर करण्यासाठी परवडणारे ब्रॉडबँड कनेक्शन, स्मार्ट मोबाईलसारखी उपकरणे, मासिक डेटा पॅकेज उपलब्ध करणे आवश्यक आहे," असे या अहवालात म्हटले आहे. 

'सायबर गुन्हेविरोधी धोरणात्मक राष्ट्रीय उपाय' या शीर्षकाखाली हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगातील सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध असूनही ती अद्याप फक्त 35 कोटी लोकांनाच इंटरनेट उपलब्ध झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
इंटरनेटचा वापर सोपा होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, तसेच त्याविषयी माहिती देणाऱ्या संस्था उभ्या करण्याची सूचनाही या अहवालात देण्यात आल्या आहे. याविषयी कौशल्य विकास करून आंतरराष्ट्रीय संस्थांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज या अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आली आहे. 
 
Web Title: Study Says Nearly 950 Million Indians Still Don't Have Internet Connection